
Jammu Airport Attack : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवताना दिसत नाहीय. जम्मूमधील विमानतळावर पाकिस्तानने हल्ला केल्याची ताजी माहिती समोर आली आहे. जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. 8 – 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकायला मिळाले आहेत. भारतीय सैन्याने त्यांचे हल्ले हाणून पाडले आहेत. जम्मूमध्ये सायलनचा आवाज ऐकू येत आहे. शिवाय संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॉकआउट करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, वैष्णोदेवीमध्येही ब्लॅकआउट करण्यात आले आहे.